TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 02 जानेवारी 2025 : ABP Majha

Continues below advertisement

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, आज दुपारी १२ वाजता मंत्रालयात बैठक, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. 

ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या बैठका ७, ८ आणि ९ जानेवारीला होणार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ३६  विधानसभा मतदारसंघनिहाय उद्धव ठाकरे घेतायत आढावा. 

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या दोन दिवसांत भूमिका मांडणार, दोन दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती. 

राजन साळवी हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते, ठाकरे गटातील उरलेले नेते अस्वस्थ आहेत, राजन साळवी भाजपमध्ये येणार असतील तर स्वागत करू, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. 

गरज असेपर्यंत माणसांचा वापर करायचा आणि नंतर वाऱ्यावर सोडायचं हा ठाकरेंचा स्वभाव, त्यामुळे पक्षाला ओहोटी लागायला सुरुवात झालीय, निवडून आलेले आमदारही पक्ष सोडणार, नरेश म्हस्केंची टीका. 

शिंदेंचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत राहणार, ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य. 

इंदापूरच्या अंथूर्णे गावात दत्तात्रय भरणेंवर जेसीबीतून फुलांची उधळण, परदेश दौरा आटोपून इंदापूरात दाखल झाल्यानंतर भरणेंच जंगी स्वागत.

आमदार प्रकाश सुर्वेनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. आमदार सुर्वे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी घेतली भेट.

मंत्रिपद न मिळाल्यान नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज नाशिकला परतणार, गेल्या काही दिवसांपासून भूजबळ परदेश दौऱ्यावर होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram