TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

बुलढाणा जिल्ह्यातल्या पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा, मात्र भेटीनंतरही पक्षप्रवेश झाला नाही. 

संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांसोबत शरद पवारांची बंद दाराआड चर्चा, आरक्षणाबाबत एकदा बसून चर्चा करु असे पवारांनी सांगितले असल्याची मराठा आंदोलकांची माहिती. 

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, मराठा आंदोलकांची मागणी, पवारांनी भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा.  

मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं, शरद पवारांचं टीकास्त्र, ज्यांना तडीपार केलं ते आता देश चालवतायत, पवारांचं अमित शाहांना टोला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची बैठक, देशातील विविध राज्याचे मुख्यमंत्री हजर राहणार, २०४७ पर्यंत विकसित भारत हे बैठकिचं मुख्य उद्दिष्ट. 

देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही राहणार हजर, आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत भेटीगाठीही आयोजित. 

ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार, नीती आयोगाच्या बैठकीवरील बहिष्कारावरुन विरोधकांच्या रणनीतीमध्ये फूट, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram