TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

 

 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मराठीमध्ये एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान दिलं आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं राबवलेल्या योजनांबद्दल संशय असल्यास विशेष विमानाची आणि बसेसची व्यवस्था करुन देऊ, कर्नाटकात येऊन आमच्या लोकांसोबत संवाद साधून सत्य जाणून घ्या, असं डीके शिवकुमार म्हणाले आहेत. भाजप, शिवेसना आणि महायुतीच्या नेत्यांनी जनतेची माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल, असा इशारा देखील डीके शिवकुमार यांनी दिला. भाजपकडून एका मराठी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका जाहिरातीत कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेशच्या योजनांबाबत उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी मराठीत ट्वीट करत इशारा दिला आहे.   डीके शिवकुमार यांची एक्स पोस्ट जशीच्या तशी  कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल करण्यापर्यंत ते गेले आहेत. ही बसवण्णांची भूमी आहे, आम्ही आमच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. याबाबत कोणालाही शंका असेल, तर मी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करीन, जेणेकरून ते कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधू शकतील आणि सत्य जाणून घेऊ शकतील! 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram