TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :06 ऑगस्ट 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :06 ऑगस्ट 2024 : ABP Majha

बांगलादेशमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठीच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला, राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना भारतात
४८ तासांत काळजीवाहू सरकार स्थापन करू, बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचं जनतेला शांततेचं आवाहन, मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, मोहम्मद युनूस अंतरिम पंतप्रधान बनण्याची शक्यता 
भारत-बांगलादेश ट्रेन रद्द, सीमेवर गस्त वाढवण्याचा निर्णय, सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचा सल्ला
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक, मराठा आरक्षणावर चर्चा, विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश
मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या निवासस्थानी जवाब दो आंदोलन करणार.
उद्धव ठाकरे आजपासून ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या घेणार भेटी, सोनिया गांधी, खरगे, टीएमसीच्या नेत्यांना ठाकरे भेटणार
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील आज होण्याची शक्यता.
धाराशिवमध्ये राज ठाकरेंची मराठा  आंदोलकांशी चर्चा, राज ठाकरे जरांगेंशी बोलून भूमिका स्पष्ट करणार मराठा आंदोलकांचा दावा, ठाकरेंविरोधातलं आंदोलन स्थगित
मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचा लोकसभेत स्ट्राईक रेट, शिंदेंच्या सेनेवर शिक्कामोर्तब करताना आंबेडकरांचं वक्तव्य, तर परप्रांतियांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram