TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे. विनोद तावडे आणि शाह यांच्या बैठकीतली इनसाईड स्टोरी “माझा”च्या हाती अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे.