ABP News

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 27 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण १३ दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर.

महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं  शेवटचं अधिवेशन असणार,त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित. 

राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर बहिष्कार.

विरोधकांनी प्रथेप्रमाणं चहापानावर बहिष्कार टाकला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला,  पाठ्यपुस्तकात खोटं बोल पण रेटून बोल हा विरोधकांचा पवित्रा, फडणवीसांची टीका.

आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरू,शेतकऱ्यांचे, कष्टकरांचे, कायदा सुव्यवस्था यासोबत इतरही महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर,सुनिल प्रभुचं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram