
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 March 2024 : ABP Majha
हिंसाचारानंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात, फडणवीसांनी आज बोलावली नागपूर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, नागपुरात घडलेल्या हिंसाचाराचा पोलीस अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा.
नागपूर हिंसाचार प्रकरण, काँग्रेसचं प्रतिनिधी मंडळ आज करणार हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना न्यायालयात हजर केलं, चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर चार आरोपींना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, मुख्य आरोपींपैकी एक फहीम खानला वैद्यकीय आधारावर न्यायालयीन कोठडी.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज, सर्व आरोप खोटे असल्यानं जामिनावर मुक्तता करण्यात यावी, अर्जातून मागणी.
नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड मालेगावचा, माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांची माहिती, मुठभर लोकांमुळे नागपूरचं नाव खराब, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, हिंसाचारावर फडणवसांची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्री दावोसमध्ये मोठे मोठे करार करतात, पण नागपुरात काय सुरू आहे यावर त्यांचं लक्ष नाही, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला.
नागपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांविरोधातला कट, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संशय, मुख्यमंत्र्यांकडून शांततेचा प्रयत्न, मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून आगीत तेल टाकलं जात असल्याचा आदित्या ठाकरेंचा आरोप.
भाजपशी संबंधित सत्तेतील लोकांचा नागपूर दंगलीशी संबंध, माझा व्हिजन कार्यक्रमात इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप, नागपूर दंगलीमागे काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याचाही आरोप.
नागपूर दंगलीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी किमान दोन दिवसांचा तरी राजीनामा द्यायला हवा होता, बच्चू कडूंचं विधान, मुख्यमंत्र्यांना राजकारण करणं जास्त महत्वाचं, कडूंचा हल्लाबोल.
विकासाऐवजी आज चर्चा कोणत्या तरी थडग्यावर सुरू, थडग्याचा मुद्दा आज संयुक्तिकच नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर सरकारला जमिनीवर आणावं लागेल, रोहित पवारांचा घणाघात.