TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होत असल्याने हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील बनला आहे. येथील मतदारसंघात पुतण्या युगेंद्र पवार विरुद्ध काका अजित पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातील बुथवर दोन्ही कार्यकर्ते समोरा समोर आले आहेत. त्यातच, युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यकर्त्यांवर दमदाटीचे आरोप केले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी केला आहे. मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही याची तक्रार करणार असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले. त्यावर, आता अजित पवारांनी हे सर्व आरोप फेटाळले असून निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस यंत्रणा याबाबत पाहून घेतील, असेही अजित पवार म्हणाले.  

बारामतीतील बालक मंदिरातील मतदान केंद्रामध् अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी व धमकी दिली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. तसेच, येथील मतदारसंघात मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत असल्याचा प्रकार होत असल्याचेही शर्मिला पवार यांनी सांगितले. त्यावर, अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''तो आरोप धादांत खोटा आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्वकाही आलं असेल. तसं काही असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहतील. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाही धमक्या दिल्या नाहीत. माझा कार्यकर्ता असं कधीही करणार नाही, माझा माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच, काही गैरप्रकार वाटत असल्यास पोलीस तक्राराची चौकशी करतील,'' असे अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, मलाही माझा कार्यकर्ता सांगत होता, दादा मला आतमधून बाहेर काढलं. माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं होतं, त्यामुळे मी पण माझ्या कार्यकर्त्यांना तक्रार द्यायला सांगेन, असेही अजित पवारांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram