TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

 राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अर्थखातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास खातं देण्यात येणार आहे. गृह आणि महसूल खात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा राहणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. येत्या 24 तासांत खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   शिवसेनेची खात्यांची यादी मुख्यमंत्र्यांना पोहोचल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी बुधवारी दिली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार असल्याची माहिती आहे.   कसे असेल संभाव्य खाते वाटप?  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंत्रिमंडळात होती ती महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. तर शिंदेंना हवं असलेले गृहखातं हे भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहखातं आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. तर नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला देण्यात येणार आहे.   राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जाणार असून ते अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून आदिती तटकरे या त्या खात्याच्या मंत्री असणार आहेत अशी माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram