TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 30 July 2024 : ABP Majha
सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी तीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार, बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागावाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता.
गौतम अदानी-मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक
उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले, मात्र भेट न घेतल्यानं सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज. नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन केलं अभिवादन.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आंदोलनाचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा, आज दुपारी १२ वाजता मातोश्री इथं कार्यकर्ते जमणार, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी.
७ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून होणार सुरुवात, विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा.
स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली मनोज जरांगेंची भेट, दीड तास दोघांमध्ये चर्चा, चळवळीतली माणसं एकत्र आल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होते असं नाही, राजू शेट्टींची भेटीनंतर प्रतिक्रिया.