TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो एक्वा लाइन ३ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत. आरे जेव्हीएलआर स्टेशन आणि वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स या दोन्ही स्थानकांवरून सकाळी ११ वाजता मेट्रोच्या सेवेला सुरुवात होणार.
मेट्रो 3 च्या दिवसभरात जवळपास 96 फेऱ्या होणार , बीकेसी, विद्यानगरी स्टेशन, सांताक्रुझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 सह 9 भूमिगत स्टेशन असणार. 
 नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्रीशिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री शिंदेंसोबत फडणवीसही आज दिल्लीत असणार.  
जागावाटपाबाबत आजपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका, सलग तीन दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागावाटप अंतिम करणार
हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार. 
 पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट, पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवारांना निमंत्रण.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram