TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, बाळासाहेबांना जो भारत अपेक्षित होता, तो मोदींनी तयार केला, फडणवीसांचं वक्तव्य.     

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाल्यावर पंतप्रधान कोणाला करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल. 

देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशद्रोही झालेत का?, उद्धव ठाकरेंचा सवाल.  

ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो, म्हणून त्यांनी भाडोत्री घेतलाय, उद्धव ठाकरेंची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका. 

उद्या मोदी संघाला देखील नकली संघ म्हणतील, आम्ही स्वयंपूर्ण झालोय, आता आम्हाला संघाची गरज नाही असं मोदी उद्या म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. 

भाजप सत्तेत आली तर ते आता संघावरच बंदी आणतील, जे पी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram