Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज ABP Majha
नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा पदभार, खातेवाटप आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता, महत्त्वाच्या चार खात्यांमध्ये कुठलाही बदल नसणार, सूत्रांची माहिती
२४ तास उलटायच्या आत एनडीएत खदखद, कॅबिनेट खातं न मिळाल्याने खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड, शिंदे गटाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप
मंत्रिपद वाटपावरून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतूनही नाराजी व्यक्त, अण्णा बनसोडेंकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त
(())
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, पुणे राष्ट्रवादीनं मंजूर केला ठराव, अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष
((सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणार?))
कोल्हापूरचे विजयी उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्री निवासस्थानावर दोघांमध्ये चर्चा
((शाहू महाराज छत्रपती 'मातोश्री'वर))
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सफर
नीट परिक्षेतील गोंधळाविरोधात देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निदर्शनं.. निकालाची फेरतपासणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, तर पेपरफुटीची एसआयटी मार्फत चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका
नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले, दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू, स्थानिकांचा संताप
मरीन ड्राईव्ह ते वरळी अंतर फक्त ९ मिनिटांत पार होणार... कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत
‘नीट-यूजी’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी, परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, सहा धावांनी भारताची पाकिस्तानवर मात, लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचं आव्हान संकटात.
स्पेनच्या २१ वर्षीय कार्लोस अल्काराझ लाल मातीचा नवा बादशाह....जर्मनीच्या अलेक्झांडर झवेरेव्हला हरवून फ्रेंच ओपनचं जेतेपद