TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह आतापर्यंत ७ जणांना अटक
अग्रवालांच्या मुजोरीचा नवा पुरावा, दोन पुणेकरांचा जीव घेणारी पोर्शे कार नोंदणीशिवायच रस्त्यावर, पुणे आरटीओच्या माहितीनंतर पितळ उघडं, तर विरोधी पक्षाकडून अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी
पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात...राज्यात ५४.३३ टक्के तर संथ मतदानावरुन उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये आरोपांची राळ
शिंदेंचे बालेकिल्ले असलेले ठाणे आणि कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान, तर कमी मतदानाचा कोणाला फटका, कोणाला फायदा यासाठी निकालाची प्रतीक्षा
बारावीच्या 15 लाख विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार, थोड्याच वेळात बोर्डाची पत्रकार परिषद तर दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी २४ मेपासून नोंदणीला सुरुवात, प्रवेशासाठी यंदा तीन नियमित तर दोन विशेष फेऱ्या
नागपुरात जातीचे खोटे दाखले बनवून नामांकित शाळांमध्ये प्रवेश, आरटीई अन्वये प्रवेश घेणाऱ्या १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल
मराठवाड्यात जलसाठ्यांनी तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड
आचारसंहितेचे नियम शिथिल करुन चारा उपलब्ध करुन द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा
सचिनने ऑनलाईन रमीच्या जाहिराती बंद कराव्यात, गेमच्या व्यसनातूनच त्याच्या अंगरक्षकाची आत्महत्या, आमदार बच्चू कडू यांचा आरोप, घरासमोर पुतळा जाळून आंदोलनाचाही इशारा
आयपीएल प्लेऑफच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये आज कोलकाता आणि हैदराबाद नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भिडणार, विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार