TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 04 PM : टॉप 50 न्यूज : 28 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Sonia Doohan on Sharad Pawar NCP : मुंबई : राष्ट्रवादीतील (NCP) अंतर्गत फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra News) वेगळं वळण लागलं आहे. पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे. अशातच अनेक कार्यकर्त्यांनी थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ देणं पसंत केलं. तर काहीज शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहण्यावर ठाम राहिले. अशातच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विश्वासू आणि राष्ट्रावादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान (Sonia Doohan) अजित पवार गटात (Ajit Pawar Group) जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सर्व चर्चांना स्वतः सोनिया दुहान यांनी पूर्णविराम दिला आहे. माझी शरद पवारांवर निष्ठा कायम आहे, मी पक्ष सोडलेला नाही, असं सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या सोनिया दुहान म्हणाल्या की, "मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. असं पाहायला गेलं तर, ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सुप्रीया सुळेही तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असं म्हणायचं का? धीरज शर्मांसारखे सर्वच लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील."

शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रीया सुळे यांच्यासाठी आम्हाला आदर आहे. पण, त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाहीत. लीडर होण्यात त्या कमी पडल्या, असं सोनिया दुहान म्हणाल्या आहेत. मी लवकर पक्ष जोडण्याचा निर्णय घेईन, मी सध्या इतर कोणता पक्ष जॉईन करणार नाही, सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे. लोका त्यांना का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असंही सोनिया दुहान म्हणाल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram