TOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 September 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 September 2024 : ABP Majha
राज्य सरकार अदानींकडून वीज खरेदी करणार, ६ हजार ६०० मेगा वॅट खरेदीचं टेंडर अदानींना, सरकारकडून अदानींसोबत २५ वर्षांसाठी करार.
आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जरांगेंचं उपोषण.
सरकारला आणखी एक संधी देतोय, आमच्या समाजाला राजकारणात जायचं नाही, आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंचं वक्तव्य. 
महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, 'स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती. 
विधानसभा निवडणुक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये घेण्यास प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल, मुख्यमंत्र्यांची माहिती.  
किती टप्प्यात निवडणुका घ्याव्या याचा अधिकार आयोगाचा, तर मी निवडणूक आयोगाशी बोललो नाही, मी ज्योतिषी नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची निवडणुकांच्या तारखांवरुन प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram