Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
विधानसभेआधी पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, राज्यातील सात हजार सहाशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन, नागपूर, शिर्डी विमानतळाला नवीन टर्मिनल
राज्याला मिळाली १० नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं... १० पैकी ५ महाविद्यालयं एकट्या विदर्भात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
'स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसने जाहीर करावं', हरियाणाच्या निकालानंतर संजय राऊतांचा इशारा.. योग्यवेळी उत्तर देईन म्हणत राऊतांच्या टीकेकडे नाना पटोलेंचा कानाडोळा
हम साथ साथ म्हणणारे, हम आपके है कौन, म्हणतायत, काँग्रेसबाबत संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला चिमटा
जागा हवी तर जिंकण्याच्या क्षमतेचा उमेदवार सांगा, मगच मतदारसंघ.. जागावाटपात भाजपची शिंदे आणि अजितदादा गटाला अट
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जाण्याची शक्यता, सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकलेल्या शिंगणेंचा व्हिडीओ व्हायरल
लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावाला ही मिळणार पहिला हफ्ता.. राज्यातील ४६ हजार विद्यार्थ्यांना डीबीटी मार्फत ४२ कोटी रुपये मिळणार..
मुंबईसह महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध आज माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दिग्गजांनी घेतलेला भविष्याचा वेध,
शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती.. तुपकरांची पत्नी ठाकरे पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता...
सिद्धिविनायक गणपती मंदिर गाभाऱ्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी लागणार भगवा टिळा.. मंदिर न्यासाने जारी केले आदेश..
सोलापूरच्या पेनूर टोलनाक्यावर टोल चुकवत बॅरिकेट उडवणाऱ्या मालवाहू ट्रकने सुरक्षारक्षकाला चिरडले.. फरार ट्रकचालकाचा मोहोळ पोलिसांकडून शोध सुरू..
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका.. जुहू येथील बंगला आणि पावना लेक परिसरातील फार्म हाऊस रिकामं करण्यासाठी पाठवलेल्या नोटीशीला आव्हान..