TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 18 June 2024 : 6 PM : ABP Majha
TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 18 June 2024 : 6 PM : ABP Majha
याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५ जुनला दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत बैठक, महाराष्ट्रातले सर्व काँग्रेसचे नेते राहणार उपस्थित.
विधान परिषदेसाठीच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा. १२ जुलैला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती आणि कार्यकारिणीची बैठक संपन्न, कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देणार, अजित पवारांचं आश्वासन.
'बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांनी वर्धापनदिन साजरा करू नये', खासदार संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला.
दादरमध्ये होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंकडून पाहणी, जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम सुरु
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याविरोधात तक्रार करणारे अपक्ष उमेदवार भारत शाह यांना जीवे मारण्याची धमकी, धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शाहांची पत्रद्वारे मागणी.