Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 7PM : 6 ऑक्टोबर 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 7PM : 6 ऑक्टोबर 2024: ABP Majha
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शनिवारी (दि.6) एका कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. कार्यकर्त्यांकडून तुतारी घ्या, असा आग्रह सुरु असतानाच रामराजेंनी मात्र, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) रामराजेंसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, तुतारी हाती घेणार नसले तरी रामराजे निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचलाय. दरम्यान, रामराजेंनी रणजितसिंहाना अपक्ष लढण्याचं आव्हानही दिलं होतं. यावर आता रणजितसिंह निंबाळकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
रामराजेंनी लोकसभेला तुतारी वाजवली, आताही तुतारी वाजवणार : रणजितसिंह निंबाळकर
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. कदाचित ही अफवा असू शकते. परंतु, लोकसभेवेळी देखील रामराजे (Ramraje Naik Nimbalkar) यांनी तुतारी वाजवली आहे. आता देखील ते तुतारीच वाजवणार असल्याचं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. तर फलटण कोरेगाव विधानसभा आम्ही जर वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू असं रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणतात. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये रेल्वेच्या कामाची पाहणी केली, यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार कामाचा माणूस असले तरी फडणवीस रणजितसिंहांना बळ देतात : विश्वजीतराजे निंबाळकर
फलटणमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुतारी हातामध्ये घ्यावी परंतु अंतिम निर्णय हा रामराजे घेतील असं मत रामराजे निंबाळकर यांचे पुतणे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे. अजितदादा जरी कामाचा माणूस असला तरी फडणवीस हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बळ देता आहेत. त्यांच्यामुळे आमच्या मागण्या मान्य होतील का? अशी आम्हाला शंका आहे, असेही निंबाळकरांनी सांगितले. विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे वडील रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे आधीच तुतारी सोबत आहेत. परंतु त्यांचा मुलगा अजित पवारांसोबत असला तरी रामराजे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं विश्वजीत निंबाळकर यांनी स्पष्ट केलं