Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 5 PM : 3 सप्टेंबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 5 PM : 3 सप्टेंबर 2024: ABP Majha  

 पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि राज्यातील बदलापूरच्या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर, पश्चिम बंगाल सरकारने आज विधानसभेत अँटी रेप विधेयक मंजूर केले आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन राज्य सरकारला फटकारलं आहे. बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही घटना गंभीरतेनं न घेत, निष्काळजी कारभार करणाऱ्या बदलापूर पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असल्याचा मुद्दा उपस्थित करत पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे. 

केस डायरीतून बदलापूर (Badlapur) पोलीसांचा निष्काळजीपण हायकोर्टात (Highcourt) उघड झाल्याचं पाहायला मिळालं. केवळ याच प्रकरणात नाही तर पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तपासाकडे गंभीरतेनं पाहण्याची गरज असल्याचं सांगत हायकोर्टाने बदलापूर पोलिसांना फैलावर घेतल्याचं आजच्या सुनावणीत दिसून आलं. बदलापूर प्रकरणात आरोपपत्र घाईघाईनं दाखल करण्याची चूक करू नका. या घटनेची सखोल चौकशी करा, आणखीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. तसेच, फरार आरोपींच्या शोधात अद्याप यश न येणं ही खेदाची बाब असून तपासयंत्रणेच्या कारभारावर देखील हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आदर्श विद्यालयचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे अद्यापही फरार आहेत. त्यामुळे, पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक न केल्याबद्दलही न्यायालयाने तपास यंत्रणांना विचारणा केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram