Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 5 PM : 28 जुलै 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 03 जुलै 2024: ABP Majha  

हेही वाचा : सत्तेत सामील होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतच्या बैठकीचे किस्से सांगितल्याचं म्हटलं जातंय. सत्तेत सामील होण्याआधी शाह यांच्यासोबत दहावेळा बैठका झाल्या. तसेच या बैठकीला जाताना ते मास्क आणि टोपी घालून जायचे, असंही खुद्द अजित पवार यांनी सांगितलं आहे. यावर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे  (Ambadas Danve)  यांनी टीका करत अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे. अजित दादा यांच्या सरख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागतं असेल तर हे वाईट आहे. हा प्रकार म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखा असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केलीय.       नारायण राणे आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल भाजप आतापर्यंत कायम कूटनीतीचे राजकारण करत आली आहे. त्यांची किती खालच्या स्तराची मानसिकता आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. कोर्टाने देशमुख यांच्यावर स्पष्ट भुमिका दिली आहे. दृष्टपणाचे हे वागणे भाजपचेच असल्याचेही अंबादास दानवे म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच जागावाटपात महायुती मध्ये वाद निर्माण झाल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली भुमिका ठरवत असतो आणि ते नेते ठरवत असतात. नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो हे पाहावे. त्यांनी बाकी अजित दादा आणि आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल. असेही ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram