Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 5 PM : 22 जुलै 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 5 PM : 22 जुलै 2024: ABP Majha 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा, जरांगे आणि हाकेंना सरकारने काय आश्वासन दिलं याबाबत विरोधकांना काहीच माहिती नाही, पवारांनी व्यक्त केली खंत
सलग चौथ्या दिवशी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक, देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी रात्री कोअर कमिटीची खलबतं, बावनकुळे, पंकजा, शेलार, दानवेंसह प्रमुख नेते हजर राहणार..
जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नाही, केंद्र सरकारचं संसदेत स्पष्टीकरण, प्रणिती शिंदेंनी विचारला होता प्रश्न...
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन नाही, विधानसभेत तिकीट कापण्याची शक्यता
डोंबिवली स्थानकात एक्स्प्रेस ट्रेन बंद पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या फास्ट ट्रेन रखडल्या
महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का ? आदित्य ठाकरेंचा सवाल, रस्तेकामात घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा...
माकपच्या नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट, महाविकास आघाडीतच राहणार असा दिला विश्वास,जागावाटपामध्ये माकपचाही विचार करण्याची विनंती..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram