TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 24 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा ११वर, मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी 

डोंबिवलीतील एमआयडीसी आणि निवासी विभागातील बफर झोन नाहीसा झाल्यानं धोका वाढला, एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बिल्डरांकडून ५०० भूखंड गिळंकृत, स्थानिक उद्योजकांचा आरोप 
((डोंबिवलीतला बफर झोन गेला कुठे?))

प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख यांचे मृतदेह ठाणे TDRFनं बाहेर काढले
((प्रवरा नदीतून दोन मृतदेह बाहेर काढले))

वेंगुर्ल्यात मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली, २ जणांचे मृतदेह सापडले तर दोन जण बेपत्ता
((वेंगुर्ल्यात बोट उलटली, चार जण बेपत्ता))

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या तीन पैकी दोन मित्रांची पोलिसांकडून चौरशी, पोर्शे कारची फॉरन्सिक तपासणी देखील पूर्ण 

पुणे अपघात प्रकरणी दोषी तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी, तर बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर 
((पब, रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर))

नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक, चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यानं पाणी संकट अधिक गडद झाल्याचा आरोप 
((गंगापूर धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा))

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित, झाडं कोसळून घरांचंही नुकसान
((सिंधुदुर्गात 'वादळी' पावसामुळे नुकसान))

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram