TOP 50 : दिवसभरातील टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज: 24 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 50 : दिवसभरातील टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज: 24 May 2024 : ABP Majha

पुणे अपघात प्रकरण, विशाल अगरवालसह सहाही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

पुणे अपघाताप्रकरणी पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता, ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब. 

नेहमीच नैतिकतेचे कांदे सोलणाऱ्या फडणवीसांमध्ये थोडितरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, पुणे अपघात प्रकरणावरुन रोहित पवारांची मागणी. 

कर्नाटकात जे झालं तेच महाराष्ट्रात होतयं, श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे दुर्दैवी, पुणे अपघातावर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. 

कल्याणीनगर अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, अपघाताची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी. 

पुण्याच्या मुंढवा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल पब्स, हॉटेलमधून हप्ते गोळा करतात, ट्विट करत धंगेकरांचा आरोप, निलंबनाची कारवाई न केल्यास आणखी काही फोटो पोस्ट करण्याचा धंगेकरांचा इशारा. 

पुणे अपघात प्रकरणात येरवडा पोलिसांनी निष्काळजीपणा केला, वरिष्ठ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकावर होणार कारवाई.

पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर ३२ पब आणि बारला उत्पादन शुल्क विभागानं ठोकलं टाळं, हीत वेळेनंतरही हॉटेल चालू ठेवल्यानं, तसंच अल्पवयीनांना मद्यविक्री केल्याचा बार, पबवर ठपका.

पुणेे अपघाताची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही,आरोपीचे मद्य पितानाचे सीसीटीव्ही आहेत, आम्ही कोर्टात आमची बाजू ताकदीनं मांडणार, पोलील आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram