Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट: 21 June 2024 : 6 PM ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट: 21 June 2024 : 6 PM  ABP Majha

NEET चा पेपर ३२ लाख रुपयांना विकला गेला, परीक्षेआधी एक दिवस प्रश्नपत्रिका दिली गेली, ४ आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याची सूत्रांची माहिती.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालयात नीट परीक्षा घोळाविरोधात आंदोलन, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात. 

मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये काँग्रेसचं आंदोलन, नीट परीक्षा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी, आंदोलनात नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप सहभागी.

महायुती सरकारविरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन. महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात आंदोलन. यावेळी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

युजीसीकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर डिफॉल्टर विद्यापीठांची यादी जाहीर, त्यामध्ये देशातील तब्बल १५७ विद्यापीठांचा समावेश. 

सीईटीच्या पेपरमध्ये अनेक चुका होत्या, विद्यार्थ्यांप्रति सरकारची जबाबदारी आहे की नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल, तर फेरपरीक्षा नको ही आमचीही मागणी, ठाकरेंचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram