Top 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 01 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 01 July 2024 : ABP Majha

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा सुरू. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं प्रथमच भाषण. जय संविधान म्हणत केली भाषणाची सुरुवात.

अग्निवीर योजना लष्कराच्या विरोधात असून देशाच्या विरोधात आहे. ते तरुणांच्या विरोधात. आमचे सरकार आल्यावर ही योजना बंद करू, भाषणात राहुल गांधींची अग्निवीरवरून मोदींवर टीका.

नरेंद्र मोदींनी अयोध्येतून निवडणूक लढविण्यासाठी सर्व्हे केला. तेव्हा त्यांना अयोध्येतून निवडणूक लढवू नये असे सांगितले. जर मोदी तिथून लढले असते तर त्यांचा पराभव झाला असता. म्हणूनच ते वाराणसीत गेले. राहुल गांधींची मोदींवर टीका.

राहुल गांधींचं भाषण सुरु असताना पंतप्रधान मोदींनी,  संपूर्ण हिंदू समाजाला हिंसेशी जोडणे योग्य नाही असं म्हणत रोखलं. तर अमित शाह यांनी या वक्तव्याबाबत राहुल गांधीनी माफी मागावी असं म्हटलं.

लोकसभेत बोलताना राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांवर टीका. सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत. भाजपा हिंसा पसरवतं” राहुल गांधींचं वक्तव्य. यावर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी सुनावत कोणत्याही धर्माबद्दल कमेंट न करण्याचं केलं आवाहन.

नवीन कायद्यांनुसार सामूहिक बलात्कार प्रकरणात २० वर्षांची तर अल्पवयीनांवर बलात्कार झाल्यास फाशीच्या शिक्षेची कायद्यात तरतूद, पीडितेचा जबाब तिच्या घरी, कुटुंबासमोर घेतला जाईल, अमित शाहांची माहिती. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram