TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 09 PM : 28 May 2024 : ABP Majha
पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये (Pune Kalyani Nagar Accident) झालेल्या अपघातात दोन जणांचा जीव गेला. या अपघाताची चर्चा देशभरात झाली. पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar) हे या प्रकरणापासून दूर राहिल्याचे पाहायला मिळाले. अधिकाऱ्यांना कामाला लावणारे, सकाळी बैठका घेणारे अजित पवार पुण्याच्या भयंकर घटना घडल्यानंतरही आपुण्यात फिरकले का नाहीत. विशेष म्हणजे या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंना आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्याच्या सापडले आहेत. अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार केलला फोन देखील वादग्रस्त ठरला आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अंजली दमानियांनी तर थेट अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
अंजली दमानिया म्हणाल्या, अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते. खरंतर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता . पण इकड तिकडच्या गोष्टी मांडल्यानंतर पुण्याच्या घटनेवर थोडेसे बोलले . ज्या पद्धतीने ते बोलले आपण सर्वांनी पाहिले. त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं तेथे झाले नाही तर ते विरोधी पक्षावर देखील भडकतात. त्यांची देहबोली अतिशय गांगरल्यासारखी होती ते धादांत खोटे बोलत होते. जो मी आधी प्रश्न मांडला होता त्यांना या प्रश्नावर बोलायला चार दिवस का लागले. कालचा त्यांचा जो तोरा होता त्यावरून मला असं वाटतं ते धादांत खोटे बोलत आहे त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे.