Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : संध्याकाळच्या बातम्या : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

MPSC च्या वतीनं होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरती परीक्षा २५ डिसेंबरला, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनेचा विरोध, मात्र परीक्षा घेण्यावर MPSC ठाम. 

शिर्डीतील साई मंदिर २० डिसेंबरला दुपारी ((१: ४५ ते ४ :३०)) पावणे दोन ते साडे चार या वेळेत दर्शनासाठी राहणार बंद, थ्रीडी स्कॅनिंगसाठी गठीत करण्यात आलेली समिती मूर्तीची पाहणी करणार असल्यानं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय.   

शिर्डीतील साई मंदिरात आजपासून हार, फूल आणि प्रसाद वाहण्यास परवानगी, कोरोना काळापासून घालण्यात आली होती बंदी.

२०२२-२३ मध्ये एसटी बसचे २८३ अपघात. ३४३ लोकांनी गमावला जीव, यंदाच्या वर्षात नोव्हेंबरपर्यंत २ हजार २८६ अपघातात २०१ लोकांचा मृत्यू, तर ३३४ लोक जखमी. 

एनआयएच्या टीमकडून अमरावतीत एकजण ताब्यात, अमरावतीच्या छायानगर परिसरात कारवाई, हा युवक पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती.

भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात NIAची कारवाई, पथकाने एकाला घेतलं ताब्यात, पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा. महिला सन्मान निधीअंतर्गत महिलांच्या खात्यावर दर महिना एक हजार रुपये जमा होणार. मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर. निवडणुकीनंतर २१०० रुपये देण्याचं आश्वासन.

दंतेवाडामध्ये पोलिसांच्या कारवाईत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा, नक्षलविरोधी सर्च ऑपरेशनदरम्यान आज सकाळपासून कारवाई, नारायणपूर,दंतेवाड़ा,जगदलपूर,कोंडागांव जिल्ह्यात ऑपरेशन.

चेन्नईत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी, अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी. पेरांबूर, माधवरम, अय्यापक्कम येथील ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या पर्जन्यमापक स्थानकांवर 7 सेमीपेक्षा जास्त पावसाची नोंद.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram