TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 5.30 PM : 20 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 5.30 PM : 20 June 2024 : ABP Majha

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता,  मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पाऊस. 

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. 

सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी, हवामान विभागाची माहिती, चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज.

रायगडमध्ये सकाळपासून पाऊस सुरुच, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात जोरदार पाऊस, श्रीवर्धन तालुक्यातील काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, शेतात पाणीच पाणी.  

चिपळूण, दापोली, खेडसह गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध सवतसडा धबधबा प्रवाहित तर परिसरातील नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या. 

मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागात पाणी साचलं, खेडेगोळवली परिसरात रस्ते जलमय, शेकडो घरांमध्येही पाणी शिरलं. 

कल्याणमध्ये झालेल्या पावसानंतर शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी, मात्र केडीएमसी अधिकारी फिरकले नसल्याची नागरिकांची माहिती. 


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram