Top 25 news : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024 : ABP Majha
Top 25 news : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024 : ABP Majha
महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, 'स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती.
विधानसभा निवडणुक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये घेण्यास प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा असेल, मुख्यमंत्र्यांची माहिती.
किती टप्प्यात निवडणुका घ्याव्या याचा अधिकार आयोगाचा, तर मी निवडणूक आयोगाशी बोललो नाही, मी ज्योतिषी नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची निवडणुकांच्या तारखांवरुन प्रतिक्रिया.
शिंदे गटाचा स्ट्राईक रेट गद्दारीमध्ये जास्त आहे, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल.
भाजपच्या सांगण्यावरुन निवडणुकांची तारीख ठरते, हिंम्मत असेल तर पालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, संजय राऊतांचं आव्हान.
मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, मला गुलाबी रंगाची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दादांचं उत्तर, पांढरा रंग चांगला स्वच्छ, मी ही पांढरेच कपडे घातलेत, अजित पवारांचा टोला.