TOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP Majha
अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा, निवडून येण्याच्या स्थितीत असलेल्या ७५ जागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार, सहा प्रमुख नेत्यांना दिली विभाग निहाय जबाबदारी.
महाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती, एमआयएमचा निर्णय वरिष्ठ घेतील, थोरातांचं वक्तव्य.
पुढील महिन्यात एसटीच्या ताफ्यात येणार नव्या १०० बसेस, नोव्हेंबरमध्ये आणखी ३०० नव्या लालपरी, अंतिम चाचणी पूर्ण.
ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख ६१ हजारांचा फायदा, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना ५० टक्के तिकिटांचा मोठा फायदा एसटी महामंडळाला झाल्याची माहिती.
रायगडमध्ये एमआयडीसीतल्या कंपनीत स्फोट, ३ जणांचा मृत्यू, धाटाव एमआयडीसीतली दुर्घटना, सहा कामगार जखमी, वेल्डिंगचं काम सुरु असताना मिथेनॉलच्या संपर्कामुळे स्फोट झाल्याची माहिती.
ढोलताशा पथकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ढोलताशा पथकात 30 पेक्षा अधिक सदस्यांवर बंदीच्या हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती.