
Top 25 News : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP Majha
१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, सर्वसामान्य नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून मोठा दिलासा, १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना ८० हजारापर्यंतचा लाभ मिळणार.
नव्या करप्रणालीत मोठे बदल, चार लाखांपर्यंत कुठलाही कर नाही, ४ ते ८ लाखांपर्यंत ५ टक्के कर, १६ ते २० लाखांपर्यंत २० टक्के, २० ते २४ लाखांपर्यंत २५ टक्के आणि २४ लाखांच्यावर ३० टक्के कर असणार.
पुढील आठवड्यात नवे आयकर विधेयक मांडणार, अर्थमंत्री सीतारमण यांची घोषणा, नवे कर विधेयक न्याय मार्गावर जाणारं असेल, सीतारमण यांचं वक्तव्य.
अर्थमंत्र्यांकडून 'पंतप्रधान धन धान्य कृषी योजने'ची घोषणा, राज्यांच्या मदतीने 100 जिल्ह्यात राबवली जाणार योजना,
देशातील 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर, आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारण्यात येणार, निर्मला सीतारमण यांची घोषणा.