ABP News

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा वेगवान एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

रिझर्व बँकेचे निर्बंधांनी हवालदील झालेल्या सहकारी बँक खातेदारांना सरकार दिलासा देण्याच्या विचारात, सध्याची पाच लाखांपर्यंतची विमा संरक्षित मर्यादा वाढवणार.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची माहिती 

मंत्रालयात आता दोन वैद्यकीय सहायता कक्ष.....उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करणार


एस.टी.महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापूनही पीएफकडे भरणा थकवला... ऑक्टोबरपासून पीएफचे हप्ते भरले नसल्यानं कर्मचाऱ्यांना पैसे काढता येईना


संतोष देशमुखांच्या हत्येमागे  भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल.. देशमुख परिवाराला पुढे करुन धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप.. तर असले आरोप शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनकुळेचं प्रत्युत्तर 

ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर, यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप.. संसदेच्या अधिवेशनात सुरु होती ऑपरेशन टायगरची चर्चा.. 

क्षेपणास्त्र मोहिमेची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या  प्रदीप कुरुलकरची लवकरच सुनावणी, दीडवर्षांपासून  आरोपनिश्चितीसाठी न्यायालयाच्या अनुमतीची प्रतीक्षा  

अंजली दमानियांच्या कृषी घोटाळ्याच्या मागोव्यात अडथळे...ऍग्रीबेग्री' वेबसाईटवर केलेली खतांची ऑर्डर पोहोचू दिली नसल्याचा दमानियांचा आरोप.

नाशकात सिंहस्थ कुंभमेळयासाठी पंचवटीतल्या रामकाल पथाच्या बांधकामाला गोदाप्रेमींचा विरोध.. नैसर्गिक जलस्रोतात बांधकाम टाळण्याचं आवाहन, कोर्टाचीही मनाई असल्याचा पर्यावरणवाद्याचा दावा

अमरावतीच्या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रहार आक्रमक, दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत स्वच्छतागृहाचं लाडक्या बहिणींच्या हस्ते उद्घाटन, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर, भाजप विधीमंडळ पक्षाची आजची बैठक रद्द, २० फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची निवड तर २१ ला शपथविधीची शक्यता

अनधिकृत इमारतींवरील नालासोपारा मनपाची तोडक कारवाई पूर्ण, डम्पिंग आणि मलनि:सारणच्या राखीव जागेवरील सगळ्या ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त


इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी ऑनलाईन जबाब नोंदवण्याची रैनाची विनंती सायबरने फेटाळली, प्रत्यक्ष येऊन जबाब नोंदवण्यावर पोलिस ठाम.. परदेशात असल्याने रैनाकडून ऑनलाईन जबाबाची विनंती

ओपनिंग वीकेंडमध्ये छावाची घोडदौड शंभर कोटींच्या पुढे.. पहिल्या तीन दिवसातच बॉक्स ऑफिसवर गाठला ११७ कोटींचा टप्पा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram