TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha
मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ, ५ अप्पर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उप आयुक्त, ७७ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ४७५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात.
२० मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मदतान, या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांकडून तयारी सुरु, मतदानावेळी ४ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार.
ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांचे मतदारांना आवाहन.
पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या १ हजार १६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार, कर्मचाऱ्यांची ने-आण, दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध.
हादेखील व्हिडिओ पाहा
Sanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Majha Vision 2024: मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा संजय राऊत म्हणाले, मोदी शाह यांनी ठरवलं तर ते कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात , पण सत्ता कायमची नाही, तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे. मोदी शाह खोटारडे, त्यांनी देशाला तेच धडे दिले. शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, मोदी कुठून जागा आणणार आहे. शिंदे, दादांची एकही जागा मिळणार नाही. आम्ही 30 ते 35 जागा जिंकणार आहे