TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 05 PM : 17 May 2024: ABP Majha

Continues below advertisement

घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेची राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी. काल उदयपूरमध्ये भिंडेला पोलिसांनी केली होती अटक.

घाटकोपर दुर्घटना प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार, याप्रकरणी गुन्हे शाखेकडून मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक, आरोपीविरोधातील प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग,  सूत्रांची माहिती. 

मुंबईत कोणत्याही नवीन जाहिरात फलकांना तूर्तास परवानगी नाही. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. शहराला बकालपणा येणार नाही, अशा रितीनेच यापुढे जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार, गगराणी यांच्याकडून स्पष्ट.

नवी मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवर. रात्रभर ५० मोठे लोखंडी  अनधिकृत होर्डींगवर कारवाई. सोसायटीवर उभारलेल्या होर्डींग प्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष , सचिवावर गुन्हे दाखल करणार. ((नवी मुंबईत ३०० पर्यंत अनधिकृत होर्डींग. त्यापैकी ५० मोठे लोखंडी  होर्डींग तोडले.))

वडाळ्यामध्ये वाहनतळासाठी उभारलेला लोखंडी टॉवर कोसळला, याप्रकरणी टॉवरच्या रचनेत काही सरंचात्मक त्रुटी होत्या का, याचा तपास झोपडपट्टी पुनर्वसवन प्राधिकरण करणार.

नागपुरात उंच इमारतीवरील धोकादायक होर्डिंगचे ड्रोनद्वारे सर्व्हे, राज्यात पहिल्यांदाच होल्डिंगच्या तपासणीसाठी ड्रोनचा वापर. 

घाटकोपर दुर्घटनेनंतर अहमदनगर महापालिका प्रशासन सतर्क, येत्या आठ दिवसात शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटचे कागदपत्र सादर करा, अन्यथा कारवाई करू, मनपाचा होर्डिंग लावणाऱ्या ठेकेदारांना इशारा. 

यवतमाळ  जिल्ह्यात दोन दिवसात ३५६ होर्डिंगवर कारवाई, शहरातील काही परिसर होर्डिंगसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित केला जाणार असल्याची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram