TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP Majha

Continues below advertisement

नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील वाद सुरू असलेल्या पाचही दानपेट्या सील, नाशिक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल, पंचवटी पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातील पाचही दानपेट्या सील.

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुरंदर बंदची हाक, बंदला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद, मराठा बांधवांकडून 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा.

नागपूरमध्ये गोंड गोवारी संवैधानिक हक्क कृती समितीचा मोर्चा, गोंड गोवारी जमातीला आदिवासींचं आरक्षण पुन्हा बहाल करण्याची मागणी.     

पुण्याच्या इंदापूरमध्ये 80 वर्षाच्या वृद्धाकडून 26  वर्षाच्या मतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीला वालचंदनगर पोलिसांकडून अटक.  

बुलढाण्यात खासगी शिकवणी वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार, जळगाव जामोद पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखलकरून आरोपी किशोर पाटीलला केली अटक. 

मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पतीकडून पत्नीवर असिड हल्ला, पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध, पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्यानंतर अॅसिड हल्ला केल्याची माहिती, आरोपी पतीला अटक.

साताऱ्यातील सज्जनगड - ठोसेघर रोडवरील बोर्णे घाटात कार दरीत कोसळली, कारमध्ये 4 जण असल्याची माहिती, एका महिलेची सुटका, इतरांचा शोध सुरू. 

बीड-परळी महामार्गावर  बुलेटस्वाराची पाच दुचाकींसह एका अॅपे रिक्षाला धडक, याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram