TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 29 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पुणे ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणी बी.जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, त्यांच्याजागी डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त पदभार. 

ब्लड सँपल फेरफार प्रकरणात अजय तावरेवर कारवाई, वैद्यकशास्त्र विभागप्रमुखपदाचा चार्ज काढला, आरोपी अतुल घटकांबळेचंही निलंबन. 

अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अगरवालचे डॉ. तावरेला  १४ कॉल, पुणे पोर्शे अपघातात पोलिसांकडून नवा खुलासा.

विशाल अगरवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला, त्यांच्या व्यवसायात कुणाची भागीदारी होती याचा खुलासा व्हावा, म्हणजे त्याला वाचवणाऱ्यांची नावं समोर येतील, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. 

ससून रुग्णालयात घडलेली बाब दुर्दैवी, जे काम करायला येतो तेच करायला हवं, केवळ दोन ते ती जणांचा स्टाफ यात गुंतलाय, इतर सगळे डॉक्टर्स योग्य पद्धतीने काम करतायत, ससूनचे डीन विनायक काळे यांचं वक्तव्य.  

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एसआयटी प्रकरणाच्या प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळेंची भेट घेतली, सापळेंनी पुणे आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर ब्लड स्पॅपल प्रकरणातील वस्तुस्थितीचा घेतला आढावा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram