Top 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 7 September 2024 : ABP Majha
Top 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 7 September 2024 : ABP Majha
बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचण आली होती. आता मात्र तिला पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकदा आयएएस झालं की देशाचे पंतप्रधानदेखील आपल्याला सेवेतून काढू शकत नाहीत या अविर्भावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चपराक असेल. पूजा खेडकरप्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करून पदं घेतली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.