Top 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
रावसाहेब दानवे हा काही कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या पराभवाचे शल्य पुन्हा एकदा बोलून दाखवलं. अनेक महाभाग आपल्या पराभवाचे क्रेडिट घेत आहेत, पण आम्ही युतीतले माणसं असून बेइमानी करणार नाही असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर यांना टोला लगावला. जालन्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपच्या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जालना विधानसभेची जागा भाजपला सोडवण्याची मागणी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागा सोडवून घेण्याच्या आम्ही प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे जालना विधानभेत महायुतीत जागावाटपावरून आगामी काळात घमसान पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे.