Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 17 ऑक्टोबर  2024 : ABP Majha 

भारतीय रेल्वेनं तिकीट आरक्षित करण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस अगोदर तिकीट आरक्षित करता येल. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भातील एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार आता पुढच्या दोन महिन्यांच्या काळातील तिकीट बुक करता येईल. यापूर्वी ते चार महिन्यांच्या कालावधीमधील आरक्षित करता येत होतं. यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठा परिणाम होणार आहे.  

रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार नवा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. यामध्ये आगाऊ तिकीट आरक्षणाची मर्यादा 120 दिवसांवरुन कमी करुन 60 दिवसांवर आणली गेली आहे. यामध्ये प्रवासाच्या तारखा वगळल्या जाणार आहेत. सध्याच्या नियमानुसार पुढील चार महिन्यांच्या कालावधीतील एका तारखेला तुम्हाला प्रवास करायचा असल्यास त्याचं बुकिंग करु शकता. नवीन नियम नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram