TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 06 June 2024 : ABP Majha
सरकारमधून मोकळं करा, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्त्वाला विनंती
देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं, आगामी काळात फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं यश मिळेल, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया
राज्यात पराभवाची जबाबदारी सामूहिक, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, टीम म्हणून काम केलं, यापुढेही करणार असल्याचं वक्तव्य
सर्वेंच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला... निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी..
बारामतीतल्या दारूण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड,
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमनं
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा स्वीकारला, १७ वी लोकसभा भंग.
8 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता.... तर मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती
नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडूंचं एनडीएला समर्थन पत्र, बैठकीनंतर एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार.
नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंगमेकर...जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडील २८ जागांची गरज...
लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली
नरेंद्र मोदींना हरवू शकतो हा विश्वास निर्माण झालाय, मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, त्यांचा ब्रँड संपलाय,फडणवीसांनी नौटंकी बंद करावी, खासदार संजय राऊतांची टीका, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल,राऊतांचं एबीपी माझावर एक्स्लुझिव्ह वक्तव्य
दिल्लीत आज एनडीएची बैठक... एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला अजित पवार गैरहजर तर... मुख्यमंत्र्यासह प्रफुल्ल पटेल बैठकीला जाणार
टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची सलामी आज आयर्लंडशी, न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर सामना, एबीपी माझावर थेट वर्ल्डकपच्या भूमीतून कव्हरेज