TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP Majha

Continues below advertisement

 विधानसभेसाठी जागावाटपात वेळ वाया घालवल्याचा काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा सूर, पटोले आणि राऊतांवर खापर...तर काँग्रेस समन्वय समितीनं दुर्लक्ष केल्याचा राऊतांचा पलटवार

ज्याला जायचं आहे त्यांनी जा, कुणाला थांबवणार नाही, नाराजीचा सूर आळवणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी ठणकावलं...अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नसल्याचंही मत

ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मोहल्ला, आमदार नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर भाजप आमदार सुरेश खाडेंकडून मिरज विधानसभा मतदारसंघाचा मिनी पाकिस्तान उल्लेख

चंद्रपूर वाघ आणि वारांचा जिल्हा, जिल्ह्यात सगळेच वाली आहेत आणि कुणीही सुग्रीव नाही, फडणवीसांची टिप्पणी...सुधीर मुनगंटीवार आमचे नेतेच आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण...

मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळ यांची भेट.. खात्याच्या कामकाजाबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याची धनंजय मुंडेंकडून माहिती

भंडाऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नाना पटोलेंची सांत्वनपर भेट.. भेटीवेळी फडणवीस आणि पटोलेंमध्ये १० मिनिटं बंद दाराआड चर्चा

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल, ठाकरेंच्या नेत्यांची पोलिसात धाव, सत्ताधारी पक्षाच्या आयटी सेलचा प्रताप असल्याचा आरोप

संजय शिरसाटांच्या मुलीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहणी दौरा, टीका होताच फोटो डिलीट, शासकीय कामाची पाहणी मंत्री करतात, अंबादास दानवेंची टीका, पाहणी करणं गैर नसल्याचं शिरसाटांचं उत्तर

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram