TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP Majha

Continues below advertisement

सार्वजनीक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट, उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंचं अभिनंदन.

अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना कोयता गँगचा बंदोबस्त केला होता, दादांनी आता बीड आणि परभणीचं पालकमंत्रिपद स्वीकारावं, अमोल मिटकरींची एक्स पोस्ट. 

नव्या मंत्रांना दालनाचे वाटप, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटलांचं दालन मुख्य इमारतीत, तर बावनकुळे, विखे, गिरिश महाजनांचं दालन विस्तारित इमारतीत.

पुणे अहिल्यानगर मार्गावरील अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून रास्तारोको आंदोलन, वाहन चालकाला फाशीची शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी.

बुलढाण्याच्या लोणारमध्ये ग्रामीण रुग्णालयात आग, एका रुग्णाचा होरपळून मृत्यू, लोणार पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद.

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोरेगाव भीमामधील विजय स्तंभाची पाहणी, विजयस्तंभ अभिवादन दिनाचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांचा दौरा. 

पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द,  केंद्र सरकारचा मोठा निर्णय.  फेरपरीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्यांना त्याच इयत्तेत बसावं लागणार. 

दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पूजा खेडकरने युपीएसी आणि समाजाची फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं न्यायालयाचं निरीक्ष, चौकशी अवश्यक असल्याचंही न्यायालयाकडून स्पष्ट. 

मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग , अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न, आगीचं कारण अस्पष्ट. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram