TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 25 May 2024: ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 25 May 2024: ABP Majha
राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं...मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण...नद्या कोरड्याठाक...
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवालला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी...ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अगरवालचा पाय खोलात...अपहरण आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणार...
डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहता यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही..स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या दहावर
२०१६मध्ये डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीतील स्फोटाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती, केमिकल कंपन्या आणि बफर झोन कसा असावा, हे अहवालात नमूद.
बीडमधील परळीमध्ये लोकसभा मतदानावेळी बूथ कॅप्चरिंग झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप, तर निवडणुकीत पराभव दिसत असल्याने बूथ कॅप्चरिंगचा आरोप, सुनील तटकरेंचा पलटवार.