TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 04 PM 19 September 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद...
विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट
मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार
अजित पवारांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा राष्ट्रवादीला संशय, आक्षेपार्ह मजकूर असलेलं पेज फॉलो झाल्याने संशय बळावला,
मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली
मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा
राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, आज राज्यभर आंदोलनं, तर दोन्ही नेते आपआपल्या नेत्यांवर ठाम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार... आज दुपारी ४ वाजता रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हातात घेणार
भाजप अध्यक्ष नड्डांचं खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तर, राहुल गांधींनी ओबीसींना चोर म्हटलं, पंतप्रधानांना दांडुक्याने पिटू म्हटलं, त्याचं समर्थन कसं कराल, नड्डांचा सवाल
भिवंडीतील विसर्जन मिरवणूक राड्यानंतर गृहखात्याची कारवाई, उपायुक्तांची तातडीने बदली, योग्य पद्धतीने परिस्थिती न हाताळल्याचा ठपका
दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार... . वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर, नेरूळ रेल्वे स्थानकाशेजारी ४० हजार घरांसाठी लॉटरी