Top 100 News : 6 AM Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 26 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Rain Update News : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा आजचा अंदाज. 

'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडरत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram