Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP Majha
संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 नंतर लोकसभेत उत्तर देणार,तसंच विरोधी पक्षनेता राहुल गांधीही चर्चेत होणार सहभागी.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा, तसेच महत्त्वाच्या विषयांवर  चर्चा झाल्याची माहिती. 
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवारांची ((मोठं)) इच्छा, तर कार्यकर्त्यांनाही तसेच वाटत असल्याने त्यांच्या मताचा आदर करावा, सुनंदा पवार यांचं वक्तव्य. 
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना आवडेल का? सुनंदा पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन अमोल मिटकरींचा खोचक सवाल. 
भावनिक होऊन आईनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं, कुटुंब म्हणून एकत्र असणं चांगलं, मात्र राजकीय दृष्टीने आम्ही वेगळे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram