Top 100 News : 10 AM Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 30 July 2024 : ABP Majha
सत्तांतराच्या चर्चेसाठी शहांना भेटायला एकनाथ शिंदे मैलवीच्या वेशात जायचे, संजय राऊतांचा मोठा दावा.
अजित परांनी वेशांतर करुन केलेला प्रवास म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ, संजय राऊतांची टीका, तर अजित पवारांनी प्रवासासाठी वापरलेल्या कादगपत्रांची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी व्हावी, संजय राऊतांची मागणी. ]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागावाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता.
गौतम अदानी-मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी तीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार, बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाची नोटीस, २ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे पूजा खेडकरांना निर्देश, मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित न राहिल्याबद्दल नोटीस.
पूजा खेडकर अपंगत्व प्रमाणपत्राचा सुधारित चौकशी अहवाल तयार, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांना आज अहवाल सादर करणार, सुधारित अहवालात कोण दोषी ठरणार येणार समोर.
उरण हत्याकांडातील संशयित आरोपी दाऊद शेखला गुलबर्ग्यातून अटक, २५ जुलैच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी दाऊद शेख तरुणीचा पाठलाग करताना दिसला होता.