Top 100 News : 10 AM Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 26 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 News :  10 AM Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा : 26 July 2024 : ABP Majha

शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची एवढ्यात सुटका नाही, मुंबई पोलिसांच्या क्लीनचीटच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करायला सत्र न्यायालय तयार..

भाजपचा राजीनामा दिलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार, २०१४ पर्यंत होते शिवसेनेमध्येच..

शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी तातडीने सुनावणीची मागणी, अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

पुण्यात आज पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग घटला, पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड

मुंबईच्या ७ धरणांमधला पाणीसाठा ७१ टक्क्यांवर, दोन दिवसांतच १३ टक्के वाढ..वैतरणावरच्या तीन प्रकल्पांतही ७१ टक्के पाणीसाठा..

मुंबईत पहाटेपासून पावसाची विश्रांती, आज मुंबईतल्या शाळांना सुट्टी नाही, रेल्वे रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा, कॉलेजला आज सुट्टी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, मुसळधार पावसामुळे निर्णय

सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती, कर्नाळ रस्ता पाण्याखाली, पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला, कोयना धरणातून २० हजार क्युसेकने विसर्ग सुरूच

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram