Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानं राज्यातील राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. मात्र, जागा वाटप झाल्याचा दावा करणाऱ्या महायुतीत अनेक मतदारसंघावरून घमासान होण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या (BJP) ताब्यात असलेल्या अकोला (Akola District) जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून माहितीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांनीही अकोटमधून (Akot) उमेदवारीसाठी शड्डू ठोकलाय. मिटकरी आणि बाजोरियांनी या मतदारसंघात भाजपच्या आमदाराविषयी नाराजी असल्याचा दावा केला आहे.                      

अकोट... अकोला जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ. भाजपचे प्रकाश भारसाकळे 2014 पासून सलग दोनदा येथून विजयी झाले आहेत. मात्र, भाजपच्या ताब्यातील याच मतदारसंघावर महायुतीत भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फायरब्रँड आमदार अमोल मिटकरींनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मिटकरी अकोट तालुक्यातील कुटासा गावचे रहिवाशी आहेत.      

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram